नमस्कार,
डिसेंबर च्या माझ्या वाढदिवसाच्या दरम्यान जी राज्य-व्यापी यात्रा मी महाराष्ट्रामध्ये फिरणार आहे आणि ज्यातून महाराष्ट्राचे बकाल स्वरूप आणि जे प्रश्न मी जाणून घेणार आहे त्या बाबत मी सध्या माझा आतला आवाज ऐकून चिंतन करतो आहे.
व्यवस्था, सरकार, शरद पवार ते राज ठाकरे किंवा कोणताही राजकीय पुरुष किंवा स्त्री या व्यतिरिक्त नेटवरून मला देण्यात येणाऱ्या शिव्या, स्तुती आणि विचारणा या व याव्यतिरिक्त कुठल्याही बाबीवर मी तूर्तास लेखी किंवा तोंडी प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही.
साधारण दीड महिन्यानी "काय केले पाहिजे - भाग १ " मराठी मध्ये आणि "what is to be done - Part 1" हे इंग्लिश मध्ये माझ्या सध्याच्या चिंतनाचे सार मी पुस्तकरूपाने प्रसिद्ध करीन ज्यात या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील (मला घातलेल्या निरर्थक शिव्यांची सोडून).
ते या यात्रेचे पहिले पाउल असेल.
ते पुस्तक प्रसिध्द करून आणि सर्वांच्या सर्व शंका मिटवूनच मी यात्रेला सुरुवात करेन.
तोपर्यंत माझाबद्दल ज्याला जे समजायचं आहे त्याने ते समजाव कारण स्वातंत्र्य चिरायू आहे आणि मी मर्त्य आहे यावर माझा विश्वास आहे किंवा मी विश्वास ठेवला नाही तरीही ते खरेच आहे !
यातलं अत्यंत महत्वाच म्हणजे जरी मी उत्तर देत नसलो तरी ही मला येणार्या प्रत्येक प्रतिक्रियेची नोंद मी ठेवत आहे, त्यामुळे आपण प्रतिक्रिया देणे थांबवू नये.
आपणा सर्वांस प्रेम,
राजू परुळेकर.
1 comment:
raju tu tujhya vicharannee pudhe chalala aahes.lokshaheemadhye pratyek vyakteela vaicharik aani bhashan swatantry milale aahe.tujhya mitranvishayee tu nehamee changale lihato.pan tu je lihato te tujhe swatahche aahe.tu manapasun lihato aani tujhya lekhaneecha jhara akhand vahat rahto.to asach vahat raho.tula shubheccha !
Post a Comment