येत्या ४ डिसेंबर ला मी ४१ वर्ष पूर्ण करत आहे ज्याला अजून ६ महिने आहेत.
हे सहा महिने मी स्वतःचा शोध घेत आहे.
६ महिन्यांनंतर म्हणजेच ४ डिसेंबर च्या दरम्यान गडचिरोली पासून सुरुवात करून मुंबई पर्यंत महाराष्ट्राचे ३७५ तालुके मी पायाखाली घालणार आहे.
शक्यतोवर सार्वजनिक वाहनाने आणि शक्य नसेल तिथे खाजगी वाहनाने. महाराष्ट्राचा खरया अर्थाने 'शोध आणि बोध' मी या सगळ्यातून घेणार आहे.
एकापरीने तो माझ्या स्वतःचाच शोध आणि बोध असणार आहे.
त्यानंतर २३ मार्च २०११ रोजी, ज्या दिवशी भगतसिंग यांना लाहोर येथे फासावर चढवण्यात आले त्या दिवशी मी माझ्या 'नौजवान भारत अभियाना' ला सुरुवात करणार आहे.
ज्यांना या महाराष्ट्रव्यापी शोधपर्वात भाग घ्यायचा आहे आणि आपल्या काळातल जग बदलून टाकायचं आहे त्या सर्व तरुण - तरुणींनी (वय कितीही असो) rajuparulekar@rajuparulekar.com या माझ्या इमेल आयडी अथवा९८२०१२४४१९ या माझ्या मोबाईल वर संपर्क साधावा. आता माझ्या या वेबसाईटवरून मी पुढच्या सर्व सूचना आणि विनंत्या (आदेश नव्हे) आपणास देईनच.
जग बदलण्याची हीच वेळ आहे आणि ते आपणच बदलले पाहिजे ही माझी ठाम धारणा झाल्यावरच मी हे पाउल उचलत आहे.
भय, भूक, दारिद्र्य, भ्रष्टाचार आणि पर्यावरणाचा विध्वंस
यांच्या विरोधात एकच शस्त्र उपसले जाऊ शकते आणि ते म्हणजे आपण स्वतः.
स्वतःचा जन्म सार्थकी लावण्याचा हाच एक मार्ग आहे.
एखाद्या निष्णात सर्जन च्या दहावी पास मुलाकडून तो केवळ त्या सर्जनचा मुलगा आहे म्हणून तुम्ही Appendix चे operation करून घ्याल का?
ही इथे सगळीकडे चाललेली नव-सरंजामशाहीच आहे.
याला विरोध करा नाहीतर तुम्ही अश्या मध्य-युगीन गुलामगिरीत सापडाल.
म्हणूनच "प्रतिकार करा आणि लढा' ,
नौजवान भारत अभियान मध्ये सामील व्हा..........
या संपूर्ण प्रयोगाचा अस्तित्वात असलेल्या कोणत्याही राजकीय नेत्यांशी अथवा त्यांच्या पक्षांशी किंवा विचारसरणीशी संबंध नाही. असा संबंध आहे असे जर कुणी सांगितले अथवा पसरवले तर ती निव्वळ अफवा आहे असे समजावे आणि हे माझे सत्य-प्रमाणित विधान आहे. मी परुळेकरवादी होतो,परुळेकरवादी आहे आणि यापुढेही परुळेकरवादीच राहणार.
२३ मार्च २०११ रोजी "काय केले पाहिजे?" (What is To Be Done) हे पुस्तक मी प्रकाशित करणार आहे ज्याचा शोध मी आजपासून सुरु केला आहे.
माझ्या सत्याचा हा प्रवास मी भारताचे अखेरचे सत्यवादी श्री अण्णा हजारे यांना अर्पण करतो.
या अभियानात सामील होऊ पाहणार्या कोणत्याही व्यक्तीला इतर कुठल्या ही पक्षाचे अथवा संघटनेचे सदस्य राहता येणार नाही.
या अभियानात अश्या प्रकारची दुहेरी निष्ठा ठेऊन येणाऱ्या माणसांना स्थान नाही. असे करू पाहणार्या लोकांनी आपण असे करून आपल्याच पुढच्या पिढ्यांचा घात करत आहोत असे समजावे.
हेच विष आपण पुढच्या पिढ्यांना पाजणार का हाच खरा प्रश्न आहे.त्याचे उत्तर शोधणे हेच या अभियानाचे खरे उद्दिष्ट्य आहे.
इन्किलाब झिंदाबाद
राजू परुळेकर