रामदेवबाबांचे अहंकारासन - (माझा आजचा लोकप्रभामधील DTox) अण्णांच्या लोकलढय़ाला मिळालेला प्रतिसाद आणि माध्यमांची साथ ही रामदेवबाबांच्या अहंकाराला प्रदीप्त करणारी ठरली. रामदेवबाबा अण्णांचं उपोषण संपल्यापासून चुळबुळू लागले. त्यांना काहीतरी केल्याशिवाय स्वस्थ बसणं शक्यच नव्हतं. त्यातूनच त्यांनी प्रस्तावित चार जूनचं नवं भ्रष्टाचारविरोधी उपोषण जाहीर केलं.